वाडी वडगाव येथे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त कुस्ती स्पर्धा;पै.सागर बिराजदार बसवेश्वर केसरीचा मानकरी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२७ : लोहारा तालुक्यातील वाडी वडगाव येथे श्री महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.यात बसवेश्वर केसरी किताब पै.सागर बिराजदार यांनी पटकावला.त्यांना १ लाख ५१ हजार रुपये रोख व चांदीची गदा भुजबळ परिवारकडुन देण्यात आली.हि कुस्ती पै.सागर बिराजदार (रा.मुदगड) विरुद्ध पै.योगेश पवार (अहमदनगर) यांच्यामध्ये झाली.अतिशय अटीतटीच्या झालेल्या कुस्तीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.प्रारंभी या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल आवारे,गुरुवर्य मारुती खोबरे, वामन गाते,पंच धनराज भुजबळ यांच्या हस्ते पार पडले.या मैदानामध्ये शंभर रुपये पासून
ते दीड लाख रुपये पर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या.या कुस्ती स्पर्धेसाठी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले. केवळ कुस्ती कलेला वाव मिळावा आणि याकडे आजच्या तरुण आकर्षित व्हावा यासाठी ही स्पर्धा इतकी मोठ्या प्रमाणात भरविले असल्याचे प्रा. धनराज भुजबळ यांनी सांगितले.याप्रसंगी उद्योजक ब्रह्मानंद भुजबळ,संगप्पा भुजबळ,डॉ.युवराज भुजबळ ,प्रा.लिंगप्पा गाडेकर,दयानंद पाटील,प्रा.दत्तात्रय भुजबळ,गणपती बोडके, डॉ.अंगद गिराम,सहदेव गिराम,विठ्ठल गिराम, प्रभू लकडे,नीलकंठ ग्राम,इरप्पा बिळे,रामणा भुजबळ,गणपती बचाटे आदी उपस्थित होते. पंच म्हणून उपसरपंच अंकुश भुजबळ,व्यंकट भुजबळ,गोपाळ लकडे, बापूराव गिराम, प्रभाकर बोडके,भैरवनाथ गिराम,मोहन लकडे,शशिकांत लकडे,गुंडु भुजबळ यांनी काम पाहिले तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा नेते अरुण बोडके,संजय भुजबळ,प्रा. शंकर सोदागरे,राहुल कानडे,दिपक बेळ्ळे,
डॉ.ओम भुजबळ आदींनी सहकार्य केले.
कुस्ती मैदानाचे धावते समालोचन राजु देवकाते,प्रा.गोविंद घारगे यांनी काम पाहिले. कुस्त्या पाहण्यासाठी धाराशिव, लातुर, सोलापूर जिल्ह्यातुन व पंचक्रोशीतील
हजारो कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.