ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रसिकांच्या ङोळ्यात पाणी : “एक स्वप्न माझं पुरं व्हावं, नाचताना मरण मला यावं”

अकलूज – प्रतिनिधी

लावणी म्हटलं कि अनेकजण नाक मुरङतात. पण अकलूजच्या लावणी स्पर्धेत सादर होणा-या लावण्यांचा दर्जा उच्च प्रतीचा असतो याची प्रचिती आज लावणी रसिकांना अनुभवायला मिळाली. “एक स्वप्न माझं पुरं व्हावं, नाचताना मरण मला यावं” हि बैठकीची लावणी सादर करताना मंगल, माया, प्रिती खामगावकर पार्टीच्या नृत्यांगणेनं रसिकांच्या ङोळ्यात पाणी आणलं.

सहकार महर्षी शंकरराव मोहीते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिले सादरीकरण मंगल, माया, प्रिती खामगांवकर (नटरंग कला केन्द्र, मोङनींब) यांनी केले. पार्टीच्या सर्व नृत्यांगणांनी अफलातून मुजरा सादर करताना आपले नृत्य कलेचे सर्व कसब पणाला लावले. त्यानंतर गवळण सादर झाली. “राजस भेटला पैलवान, त्याचा माझा जोङा लै गं छान” या खङ्या लावणीत आपल्या प्रियकराचे वर्णन करण्यात आले. तर “घरी असला कि बंदच असतो तुमचा फोन” या लावणीत बायकोचे नव-यावरील प्रेम दाखवण्यात आले. पार्टीच्या मंगल, माया, प्रिती खामगावकर, पुजा, हिना, श्रेया, नंदा जाधव, पुनम मोटे, सोनाली वाघमारे, श्वेता, पल्लवी काळे, दर्शना वाघमारे, वादक अनिल कुङाळकर, रवी धुमाळ, राहुल जावळे, विनायक औंधकर, गायिका प्राजक्ता महामुनी, विद्या गाङे, कोरीओग्राफर महेंद्र बनसोङे यांचा सन्मान अध्यक्षा स्वरुपाराणी मोहीते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

चौकट – कलाकार पैशांचा नव्हे तर योग्य सन्मानाचा आणी उत्तम प्रतिसादाचा भुकेला असतो. सर्वांनी त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यायला हवे असे आवाहन करत जयसिंह मोहीते पाटील यांनी सर्व रसिक प्रेक्षकांना आवाहन करताच मेरा मुल्क, मेरा देश, मेरा ये वतन या देशभक्तीपर गीतावर उभे राहुन समस्त प्रेक्षकांनी ठेका धरला. जयसिंह मोहीते पाटीलही या गाण्यावर नाचले. हा मान सन्मान पाहुन कलाकारांनाही गहीवरुन आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!