ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुभाष देशमुख यांच्या पॅनलला आपला पाठिंबा; म्हेत्रे

सुभाष देशमुख यांनी घेतली म्हेत्रे व बळीराम साठे यांची भेट

मंद्रूप : प्रतिनिधी

विधानसभा लोकसभेच्या निवडणुका या नेतेमंडळीसाठी असतात तर बाजार समिती व स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक या कार्यकर्त्यासाठी असतात येथेही जर नेते मंडळीही सहभागी होत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जायचे कुठे हा प्रश्न आहे.आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक लढवित आहेत. कार्यकर्ता कुठल्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचे नाही, कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे ही भावना महत्त्वाची आहे.यासाठीच आपण आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी दिली.

गुरुवारी,सायंकाळी आमदार सुभाष देशमुख यांनी माजी गृहमंत्री म्हेत्रे यांची सदिच्छा भेट दिली यावेळी म्हेत्रे यांनी देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, उमेदवार धनेश आचलारे, यतीन शहा,अप्पासाहेब हलसगे, मल्लिकार्जुन गुरव,मुळेगावचे राजू काकडे आदी उपस्थित होते. यावेळी म्हेत्रे म्हणाले, देशमुख व म्हेत्रे घराण्याचे जुने संबंध आहेत.  राजकारणामध्ये एक धोरण असायला पाहिजे, नेतेमंडळींनी मोठ्या निवडणूक लढविणे अपेक्षित असते.बाजार समिती, स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक या कार्यकर्त्यासाठीच लढले पाहिजेत. मात्र तेथेही नेतेमंडळी निवडणूक लढवित असतील तर कार्यकर्त्यांनी कोणत्या निवडणूक लढवायचे त्यांनी काय फक्त पक्षाचेच काम करायचे का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा प्रामाणिकच असतो मात्र त्यांना कधीच संधी मिळत नाही हीच बाब हेरून आमदार देशमुख यांनी कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. कार्यकर्त्यांना संधी मिळावी ही आपली भावना आहे त्यामुळेच आपण देशमुखांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण व उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या तिन्ही मतदारसंघात आपल्या मानणाऱ्या सर्व समर्थकांना आपण देशमुख याच्या पॅनलला निवडून देण्याचे आपण आवाहन करीत आहोत.

यावेळी देशमुख म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळावी याच भावनेने आपण ही निवडणूक लढवित आहोत यात आपला कोणताही स्वार्थ नाही. खरंतर सहकार क्षेत्रात पक्षाचा संबंध नसतो त्यामुळे आपण आज बळीराम साठे यांच्या बरोबरच सिद्धाराम म्हेत्रे यांची भेट घेतली आहे.अजून काही नेतेमंडळी आपल्याला पाठिंबा देणार आहेत हे निवडणूक बाजार समितीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण लढवित आहोत त्यामुळे निश्चितच मतदार आमच्या पॅनलला विजयी करतील असे विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!