नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभांचा धडाका सध्या राज्यात सुरु असून पंतप्रधान मोदींनी आज मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका सभेला संबोधित केलं. या सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेससाठी कुटुंब महत्त्वाचं आहे. त्यांनी मध्य प्रदेश राज्याला आजारी राज्याच्या रांगेत बसवलं होतं.
‘ते प्रसिद्ध, लोकप्रिय आहेत म्हणून ते आम्हाला शिवीगाळ करतात, पण आम्ही त्यांच्या शिव्याही सहन करू आणि भारत मातेची सेवाही करू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काँग्रेस विकास करत नाही. चंबलचे लोक काँग्रेसचा काळ कधीच विसरू शकत नाहीत. काँग्रेसने चंबलची ओळख वाईट कायदा सुव्यवस्था अशी करून ठेवली होती. काँग्रेसने त्यांच्या सत्तेच्या काळात मध्यप्रदेश राज्याला एका आजारी राज्यांच्या रांगेत उभं केलं होतं. काँग्रेससाठी कुटुंबचं सर्वस्व आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवरही निशाणा साधला. ‘तुम्ही ऐकलेच असेल की आजकाल काँग्रेसचे राजपुत्राला दररोज मोदींचा अपमान करतात त्यात त्यांना मजा येते. ते काहीही बोलत असतात. मी सोशल मीडिया आणि टीव्हीवरील लोक म्हणतात की, पंतप्रधानांसाठी असं बोलणं योग्य नाहीये. मोदीवर अशा पद्धतीने टीका केल्याने जनता दु:खी आहेत. माझी सर्वात मोठी विनंती आहे की, तुम्ही दुःखी होऊ नका.
ते प्रसिद्ध आहेत, पण आम्ही कामगार आहोत. भविष्यात ते खूप बोलतील. तुम्ही तुमचं डोकं खराब करू नका. त्यांच्या टीका सहन करण्यासाठीच आम्ही जन्मालो आहोत, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. भाजपसाठी देशापेक्षा मोठं काहीही नाही. पण काँग्रेससाठी त्यांचे कुटुंब सर्वस्व आहे. यात सर्वात जास्त ज्यांनी योगदान दिलं आहे, कष्ट केलेत. ज्यांनी देशासाठी सर्वात जास्त त्याग केला, त्याला मागे ठेवण्याचे धोरण काँग्रेसचं असल्याचं मोदी म्हणालेत.