नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा सुरू झालेली आहे हि यात्रा गुवाहाटीमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. यात्रेला परवानगी न दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्यांनी बॅरिकेड्स तोडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस समर्थकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. यासर्व गदारोळानंतर मुख्यमंत्री हिमंता बिश्व सरमा यांनी राहुल गांधींवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. गुवाहाटीमध्ये गदारोळ आणि ट्रॅफिक जाम केल्याचा आरोप करत राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत.
‘बजरंग दल याच मार्गाने गेला होता. याच मार्गावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची रॅलीही झाली. येथे बॅरिकेड होते, पण आम्ही बॅरिकेड तोडले पण आम्ही कायदा मोडणार नाही. आम्हाला कमकुवत समजू नका. ही काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद आहे. आसामच्या लोकांना दबावात ठेवलं जात आहे. विद्यार्थ्यांशी संवाद करण्याचा माझा कार्यक्रम रद्द करण्यात आला. विद्यार्थ्यांना मला भेटू देऊ नका, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही ते मला भेटण्यासाठी बाहेर पडले. काँग्रेस कार्यकर्ते भाजप आणि आरएसएसला घाबरत नसल्याचा, माझा संदेश आहे, असं राहुल गांधी जनतेला संबोधित करताना म्हणाले.
‘मला माहित आहे की अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास सांगितले जात आहे, पण न्याय मिळाला पाहिजे. आम्ही तुमच्याशी लढायला आलो नाही, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. आसामचे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री हिमंता यांच्याशी लढण्यासाठी आम्ही येथे आलो असल्याच राहुल गांधी म्हणाले.