ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करणार ; पटोलें सरकारवर बरसले

लातूर : वृत्तसंस्था

लोकसभेच्या महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश आल्यानंतर आता महाविकास आघाडी राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून आता कॉंग्रेस देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी सज्ज झाली असून नुकतेच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले हे मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित तीन खासदारांचा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते लातूरमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर कर्नाटक सारखी महालक्ष्मी योजना सुरू करू, असा दावा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेच्या विरोधात काँग्रेसने ही नवी रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. राज्य सरकार हे केवळ जाहीरातबाजी करत असून महाराष्ट्रात आमचे सरकार आले तर आम्ही कर्नाटक सारखी महालक्ष्मी योजना सुरू करणार असल्याचे नाना पटाले यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांची पिलावळे ही 100 च्या आत राहतील. आणि महाविकास आघाडी 180 च्या पुढे जाईल, असा विश्वास देखील नाना पटोले यांनी व्यक्त केला. याबाबतची माहिती एक अहवालातून समोर आली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये आता परिवर्तनाची लाट सुरू असून आमच्या घामाचे पैसे हे लोक हडप करत असल्याचा आरोप पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर केला आहे.

मराठवाडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आता काँग्रेसची गाडी नांदेड कडे घेऊन जाऊ आणि नांदेड ची गाडी स्वच्छ ठेवू, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना देखील टोला लगावला आहे. राज्यातही भाजपचेच सरकार आहे. एकनाथ शिंदे केवळ मुखवटा असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. भाजप दोन समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सुरू असलेल्या आंदोलनावर देखील भाष्य केले. या सर्वांना मागे भाजपचाच हात असल्याचा आरोप देखील पटोले यांनी यावेळी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!