मुंबई : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांनी पुतिन यांची उपमा दिलीय. त्यावर हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत. पराभवाच्या हताशेने शिवीगाळीवर उतरलेत. तुम्हाला माहितीय, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात, तेव्हा-तेव्हा विजय मोठा असतो. हे जेवढ्या शिव्या देणार, तेवढे लोकं मोदींवर प्रेम करणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून एक केलेला काम दाखवावे. मुंबईत पंचवीस वर्षे महानगरपालिका होती, त्यांनी केलेले एक काम दाखवावे. त्यांना तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय काही जमत नाही. त्यांचे भाषण ठरलेले आहे. उद्धव ठाकरेंचे भाषण जसेच्या तसे मी म्हणून दाखवू शकतो, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टोला लावला.
मागील 60 वर्षात जे झाले नाही ते दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवले, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे. – वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या पात्रात आणून हा भाग सुजलाम् सुफलम् करायाचा आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधाकांवर टीका केली. तर महाविकास आघाडी म्हणजे डबे नसलेले इंजिन असून, त्यातील प्रत्येकजण स्वतःलाच इंजिन समजत आहेत. प्रत्येकाची वेगळी दिशा झाली आहे, त्यामुळे त्याला गंतव्यच नाही, असे ते महणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर नागपुरातल्या प्रसिद्ध टेकडी लाइन हनुमान मंदिरात दर्शन घेतले बजरंग बली बुद्धी, शक्ती देतात. त्यामुळे त्यांच्याकडे शक्ती मागितली. जी काही आपल्या राज्यावर, देशावर संकट येतात, ती दूर करण्याची प्रार्थना केली. बुद्धी आमच्याकरीता आणि विरोधकांकरीता सूबुद्धी मागितली.