---Advertisement---

एवढ्या लवकर कुठे वर घालवताय?” शरद पवारांचे मिश्किल उत्तर !

By team
On: September 18, 2025 9:35 AM
Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोल्हापूर दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. काल चार तासांचा प्रवास करून आल्यानंतर ते हॉटेलमध्ये पोहोचले आणि काही वेळासाठी ते बाजूच्या हॉलमध्ये थांबले होते. यावेळी येथे माध्यमांचे प्रतिनिधी देखील पोहचले होते.

मात्र जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि आर. के. पवार यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधत ‘साहेब आता वर चालले आहेत. आज पत्रकार परिषद होणार नाही,’ असे सांगितले. त्यावरून शरद पवार यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

शरद पवार यांनी आपल्या खास मिश्किल शैलीत आर. के. पवार यांच्याकडे पाहत विचारले, “आता तुम्ही काय बोललात? एवढ्या लवकर कुठे वर घालवताय?” त्यांच्या या मिश्किल उत्तरानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि पत्रकार सर्वच हसले. सध्या त्यांचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. बुधवारी झालेल्या या छोट्याशा प्रसंगातून पुन्हा एकदा शरद पवारांच्या विनोदी शैलीचा अनुभव आला आहे.

शरद पवारांचा हा दोन दिवसांचा दौरा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात ते पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!