ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपकडून नाना पाटेकर निवडणुकीच्या मैदानात उतरणार ?

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात घेवून लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा मोठा दावा करीत असतांना नुकतेच अभिनेते नाना पाटेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नाना पाटेकर देखील निवडणुकीत उतरणार असल्याचे राज्यात चर्चा रंगू लागल्या आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतेच एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदींचेच सरकार येणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर ते भाजपकडून विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. नाना पाटेकर यांनी नुकताच एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार येणार असल्याचा दावा केला होता. देशापुढे भाजपशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 350 ते 375 जागा मिळतील. भाजप पुन्हा सत्तेत येऊन नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असे ते म्हणाले होते.

नाना पाटेकर यांच्या या विधानामुळे ते लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्याकडेही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. तेव्हा ते खडकवासला मतदार संघातून इच्छूक असल्याची चर्चा होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!