ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकरी आत्महत्यावर मुख्यमंत्री बोलणार का ? नाना पटोले संतापले !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून याठिकाणी सर्वच विरोधकांनी सरकारला अनेक प्रश्नावर धारेवर धरले असतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर अवघा महाराष्ट्र पेटवण्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी भाजपकडून सध्या अवघा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना असे करून नेमके काय मिळणार? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

यावेळी त्यांनी भाजपवर तुफान हल्लाबोल केला. सद्यस्थितीत राज्यातील शासकीय व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. सरकारी कर्मचारी व परिचारिका संपावर आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण सरकारला त्याचे काहीच पडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर केव्हा बोलणार? हे ही आम्हाला माहिती नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा असून, ते पेटवण्याचे काम भाजपकडून होत आहे. त्यांना या प्रकरणी काय मिळत आहे हे समजत नाही, नाना पटोले म्हणालेत. राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. यावर मुख्यमंत्री आपली भूमिका मांडतील अशी माहिती होती. पण त्यांनी अद्याप उत्तर दिले नाही. ते उद्या बोलणार असल्याचे आता समजत याहे. पण या लोकांनी जनतेला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!