सोलापूर : नागनाथ विधाते
जागतिक ग्राहक हक्क दिन निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचेतर्फे आयोजित प्रदशन व जनजागृतीचे कार्यक्रम संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती.मोनिकासिंग ठाकुर, अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर हे होते. सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस चार हुतात्मा पुतळा ते बहुउद्देशिय सभागृह, जुने जिल्हाधिकारी कार्यालय (रॅली) प्रभात फेरी येथील मुख्य कार्यालयापर्यंत सेवासदन शाळेतील १०० विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी काढण्यात आले. सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वल श्री.संतोष सरडे साहेब, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर व श्रीमती.मोनिकासिंग ठाकुर, अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये रमेश खाडे यांनी आपल्या कवितेतून विशेष मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये दक्षिण सोलापूर पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री.नासीर पठाण, पुरवठा निरीक्षक श्री.पुरुषोत्तम शिंदे, अ झोनचे श्री. डोके, ब झोनचे श्री.गवळी, क झोनचे श्री.वाघ, ड झोनचे श्री.नाईक व दक्षिण सोलापूर कर्मचारी उपस्थित होते.