ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेला छेडणारं, युवा नेत्या शितल म्हेत्रे यांची संतप्त प्रतिक्रिया.

कुरनूर : श्री स्वामी समर्थांच्या पावन नगरीत आमचा जन्म झाला आहे.अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.येथील बहुतांश लोक कन्नड बोलतात.येथे अठरापगड जाती धर्माचे लोक आनंदाने राहतात. अक्कलकोट तालुका कर्नाटक सीमेलगत असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर जिल्हासह अक्कलकोट तालुक्यावर आपला दावा असल्याचा स्पष्ट केला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निषेध करण्यात येत आहे. अक्कलकोटमध्येही ठिकठिकाणी याबद्दल निषेध करत विरोध दर्शवला आहे.

याबद्दल अक्कलकोटच्या युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र निषेध करत इशारा दिला आहे. जरी आम्ही कन्नड बोलत असलो तरी महाराष्ट्राच्या मातीशी आमची नाळ जोडली गेलेली आहे. मराठीच्या कुशीत आणि दुधनी सारख्या ग्रामीण भागामध्ये आमचा जन्म झाला. आम्ही कन्नड बोलतो म्हणून येथील भाग हा कर्नाटक मध्ये जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तो पूर्णपणे त्यांचा गैरसमज आहे. त्यांनी हा संभ्रम काढून टाकावा असं वक्तव्य करताना विचार करून करावे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये अक्कलकोटला कर्नाटक मध्ये जोडण्याचा प्रश्न येतच नाही. आणि असे काही केल्यास त्याचे वेगळे पडसाद उमटतील.

मराठी अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. खरंतर महाराष्ट्र म्हणजे आमची शान, आमची अस्मिता, येथील भाषा येथील संस्कृती आमचा प्राण आहे. आणि ते जर कोणी हिरावून घ्यायचा प्रयत्न केला तर हे कदापिही सहन करणार नाही. अश्या कडक शब्दात इशारा देत कर्नाटक सरकारचा युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी जाहीर निषेध केला आहे. यामध्ये कुठलेही राजकारण न करता हा सीमा वादाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळेल असेही शितल म्हेत्रे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!