युवकांनी खेळाच्या माध्यमातून खिलाडूवृत्ती दाखवावी : आ कल्याणशेट्टी, हन्नूर येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
अक्कलकोट : युवकांनी क्रिकेटच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवावे. स्पर्धेच्या माध्यमातून मला संघटन करण्याची शक्ती मिळाली. त्यातूनच खऱ्या अर्थाने खेळायला आणि क्रीडा स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचे कार्य सलग दहा वर्षापासून करत आहे. या मैदानातूनच तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील हन्नुर येथे आमदार चषकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे सभापती संजीवकुमार पाटील, उपसभापती आप्पासाहेब पाटील, रासाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, चपळगावचे सरपंच उमेश पाटील, पंचायत समिती विरोधी पक्षनेते गुंडप्पा पोमाजी, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, ज्येष्ठ नेते प्रभाकर मजगे, संयोजक उपसरपंच सागर कल्याणशेट्टी, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, अमोल हिप्परगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गौतम बाळशंकर यांनी केले.यावेळी बऱ्हाणपूरचे सरपंच संतोष हळ्ळोळे उपसरपंच शाहिद पिरजादे, निजपा गायकवाड, बसवराज बाणेगाव, सतीश धर्मसाले ,शरणप्पा हेगडे, सिद्राम पुजारी अनिल तळवार ,उत्तम भरमशेट्टी, राम पारतनाळे, सिद्धप्पा भकरे, नागनाथ जकिकोरे, सागर शिरोळे, संतोष बाळशंकर, नवनाथ भकरे आदी कार्यकर्ते क्रीडाप्रेमी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक १ लाख ११ हजार ७८९, उपविजेत्या संघास ५१ हजार ७८९, तिसरा क्रमांक येणाऱ्या संघास ३१ हजार ७८९, चतुर्थ क्रमांक येणाऱ्या संघास २१ हजार ७८९ बक्षीस आणि मॅन ऑफ द मॅच मॅन, ऑफ द सिरीज स्पर्धकास देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यांमध्ये विजेत्या संघास प्रत्येक सामन्यात चषक बक्षीस देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा युट्युब लाईव्ह ठेवण्यात आली आहे. लाईव्ह स्पोर्ट चॅनेलवर दाखवण्यात येणार आहे. ही स्पर्धा सलग २५ दिवस असेल. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मल्लिनाथ बिराजदार व आभार प्रा. गौतम बाळशंकर यांनी केले.