---Advertisement---

बालाजी अमाईन्समुळे सोलापूरच्या उद्योग विश्वाची मान उंचावली, मनिषा ऍग्रो सायन्सेच्यावतीने उद्योगपती राम रेड्डी यांचा सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२४ : सोलापूरचे उद्योगपती व बालाजी अमाईन्सचे सर्वेसर्वा राम रेड्डी यांचे नाव फॉर्ब्सच्या यादीत सातव्या स्थानावर आल्यामुळे सोलापूरच्या उद्योग विश्वाची मान नक्कीच उंचावली आहे, असे गौरवोद्गार मनिषा ऍग्रो सायन्सचे सर्वेसर्वा उमेश पाटील यांनी काढले. रेड्डी यांनी मिळवलेल्या यशानंतर सोलापूर येथील मनिषा ऍग्रो सायन्सेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मनीषा ऍग्रो सायन्सेसला देखील वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मिळत असते. यावेळी मनीषा ॲग्रोच्या वाटचालीबद्दल आणि प्रगतीबद्दल रेड्डी यांनी सविस्तर चर्चा केली व समाधान व्यक्त केले. बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी यांनी निर्माण केलेले वलय सोलापूरकरांना निश्चितच अभिमान वाटावे असे आहे. प्रत्येकाला हेवा वाटेल अशी कामगिरी आहे.त्यांच्या कार्याचा योग्य तो गौरव व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही हा सत्कार केला, असे पाटील यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता उमाकांत माशाळे ,उद्योजक महेश पाटील उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!