---Advertisement---

उर्मिला मातोंडकर यांचा ‘मातोश्री’वर शिवसेना प्रवेश

On: December 1, 2020 2:23 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच या चर्चेला दुजोरा दिला होता.

त्यानुसार आज दुपारी उर्मिला मुख्यमंंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचल्या. तिथं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधलं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या तसबिरीला नमस्कार केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!