---Advertisement---

कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका ; मुख्यमंत्री ठाकरे

On: January 16, 2021 2:44 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | आज देशभरात करोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राज्यात आज २८५ केंद्रावर २८ हजार ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती राज्य लसीकरण विभागातर्फे देण्यात आली.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला.

कुणाला किती लस द्यायची याचा निर्णय केंद्राचा आरोग्य विभाग घेतो. त्यामुळे कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्री म्हणून मला जसे देशातील सर्व नागरिक समान आहेत. तसेच पंतप्रधानांनाही देशातील नागरिक समान असतील, असावेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारने लस देण्यासाठी कुणाला प्राधान्य द्यायचं याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड योद्धांना लस देण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या आहेत. नाही तर मीच पहिली लस घेतली असती, असंही त्यांनी सांगितलं. राज्याला अधिकाधिक लसी येतील. जसजसं उत्पादन वाढेल तसतशा लसी येतील. एकदोन कंपन्यांच्या लसही अंतिम टप्प्यात आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर लसींचा साठा वाढेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!