---Advertisement---

कोल्हापूरचे सुपुत्र शहीद जवान संग्राम पाटील अनंतात विलीन

On: November 23, 2020 2:57 PM
Follow Us:
---Advertisement---

करवीर : जम्मू-काश्मीर मध्ये भारतमातेच्या रक्षणासाठी लढताना वीरमरण आलेले कोल्हापूरचे सुपुत्र जवान संग्राम पाटील यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी निगवे खालसा (ता. करवीर) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शहीद जवान संग्राम पाटील व ऋषिकेश जोंधळे यांच्या कटुंबियांच्या पाठीमागे राज्य शासन खंबीरपणे उभे असून त्यांना राज्य सरकारकडून प्रत्येकी रु. १ कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

शहीद संग्राम पाटील यांचे हे सर्वोच्च बलिदान कोल्हापूरसह देश कधीच विसरू शकणार नाही,असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.आज अतिशय शोकाकुल वातावरणात, आपल्या वीर जवानाला अंतीम निरोप देण्यासाठी जमलेल्या जनसागराने पुष्पवृष्टी करत पाटील यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली.यावेळी नागरिक शोकसागरात बुडाले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!