---Advertisement---

चंद्रकात पाटलांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं जोरदार प्रत्त्युत्तर

On: November 30, 2020 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. दरम्यान, या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिल आहे.

“चांगली गोष्ट आहे. कानाला, पोटाला, डोळ्याला, ह्रदयाला त्रास झालाच पाहिजे. म्हणूनच माझी नेमणूक उद्धव ठाकरेंनी केली आहे”,असा टोला चंद्रकांत पाटलांवर हाणला आहे. दरम्यान केंद्राच्या नव्या शेतकी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन शेतकऱ्यांनी सुरुच ठेवलं आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली असून शेतकरी काय दहशतवादी आहेत का? अशी विचारणा मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. तसेच उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “त्या शिवसैनिकच आहेत. बहुतेक उद्या प्रवेश करतील. त्यांच्यामुळे महिला आघाडी मजबूत होईल”.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!