ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेच्या कामांना गती देण्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मुंबई : चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेसाठी जलविज्ञान विभागाकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र तसेच संबंधित कामाचे अंदाजपत्रक तयार करून, निधी उपलब्धतेनुसार योजनेच्या कामास तातडीने सुरुवात करावी. कोसंबी लघु पाटबंधारे योजनेसंदर्भातील भूसंपादनाचा निधी प्राप्त करून त्यासही गती द्यावी, असे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात चिपळूण – संगमेश्वर अंतर्गत येणाऱ्या लघु पाटबंधारे योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री.भरणे यांनी संबंधितांना सुचना दिल्या. या बैठकीस आमदार शेखर निकम, उपसचिव दि.म. देवराज, अभिक्षक अभियंता सु.भ. काळे, शे.वि.वडाळकर, सा.भि.भराडे आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, कोसुंब व फुरूस कदमवाडी, फुरूस चव्हाणवाडी, कोसबी, साठवण तलाव गणेशपुर, ओवळी, कापरे गांग्रई या योजनेच्या भुसंपादनाचा निधी प्राप्त करून, योजना तातडीने पूर्ण करून पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा. याचबरोबर तळसर, मुंढे तर्फे सावर्डे या योजनांचे अंदाजपत्रक तयार करावेत.

महामंडळांतर्गत चिपळूण तालुक्यातील भोवडे बाईंगवाडी, वांझोळे, गोळवली, कळंबुशी या लघु पाटबंधारे योजनांचे अंदाजपत्रक तयार करून तातडीने कामे पूर्ण करावीत, असेही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!