---Advertisement---

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक फाडला ; साताऱ्यात तणावाचे वातावरण

On: January 9, 2021 4:48 PM
Follow Us:
---Advertisement---

सातारा : येथे एका बॅनरवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. कारण सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी (९ जानेवारीला) खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराज असा फलक लावण्यात आला होता. मात्र, हा फलक रात्री समाजकंटकाने फाडल्याने वातावरण चांगलेच तापले असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

पोवईनाका भागात तणावाची परिस्थीती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांनीही पोलीस बंदोबस्त वाढवला. उदयनराजे समर्थकांनी या घटनेचा निषेध करत मूक मोर्चा काढला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा फलक लावण्यात आला. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिल्यानंतर तणाव निवळला.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. या तीन भुयारी मार्गांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. आज सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग हा फलक अज्ञाताने फाडल्याचे दिसले. ही माहिती समजताच पोवईनाक्यावर उदयनराजे भोसले प्रेमी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आणि येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असून तणावाखाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!