---Advertisement---

जयहिंद कारखान्याकडून शेतकऱ्यांना खुशखबर, आता ‘हा’ मिळेल दर

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट,दि.२० : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक कार्य करणाऱ्या आचेगाव ता. दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगर्सचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून १८ फेब्रुवारीपासून ऊस पूरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन २३०० रूपये देणार असल्याचे जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना गणेश माने देशमुख म्हणाले की,यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने जयहिंदला ऊस पुरवठा केला आहे.यंदाच्या गळीत हंगामातील ऊसबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत.राहिलेली बिलेदेखील जमा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.वर्षभर शेतात घाम गाळून ऊसाचे उत्पादन घेणारे शेतकऱ्यांच्या कष्टाप्रती योग्य दाम देत असल्याचे माने देशमुख यांनी सांगितले .
दरम्यान,जयहिंद परिवाराने कायमच शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे.तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस जयहिंद शुगर्सला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन गणेश माने देशमुख यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!