---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारत मुंबई इंडियन्सने पटकावले आयपीएल चषक;कर्णधार रोहित शर्माची धमाकेदार कामगिरी

Follow Us:
---Advertisement---

शारजा, दि. १० मुंबई इंडियन्सच “बॉस’ असल्याचे आजच्या सामन्यात पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्माच्या दणकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिवाळीच्या मुहुर्तावर आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर काल झालेल्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे 157 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानास धक्का देत रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने जेतेपद पटकावले, अन्‌ चाहत्यांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली. आयपीएलच्या आजवरच्या सामन्यातील मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले. आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. रोहितने यावेळी 51 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 68 धावांची दमदार खेळी साकारली आणि मुंबईच्या संघाने पाच विकेट्‌स राखत सहज जेतेपद मिळवले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!