ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक ! ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून

औरंगाबाद प्रतिनिधी | महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल 15 जानेवारीला मतदान पार पडलं. काही मतदान केंद्रावर मशीन खराबीमुळे गोंधळ उडाला तर काही ठिकाणी राडा पाहायला मिळाला. दरम्यान, याच वेळी औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी या गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हरिसिंग गुशिंगे असं हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याच नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी गावात भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. हरिसिंग गुशिंगे असं हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याच नाव असून शुक्रवारी रात्री 9 वाजता तिघांनी गुशिंगे यांची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, हल्लेखोरांना अटक करण्यासाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले आहे. पोस्टमार्टेम करण्यालाही ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!