ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धनंजय मुंडेवरील प्रकरणी काल प्रकरण ‘गंभीर’ म्हणणारे शरद पवार आज ‘सौम्य’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. कोणावरही अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हायचे, अशी प्रथा पडू शकते असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, धनंजय मुंडेंवरील आरोपांवरून सर्व माहिती घेतली आहे. पक्षातील सर्व सहकाऱ्यांशी सविस्तर विचार विनिमय, त्यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे स्वतः कोर्टात गेल्यामुळे त्यांना पूर्वकल्पना असावी, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी विनंती केली आहे.

तत्पूर्वी, त्यांनी धनंजय मुंडेवरील आरोप गंभीर असल्याचे म्हटले होते. त्यावरून ते म्हणले की, परिस्थिती पूर्णत: माहीत नसल्याने गंभीर या शब्दाचा वापर केला असल्याचे सांगितले. या प्रकरणाची सर्व बाजूने माहिती घेतल्याचे त्यांनी नमूद केले. पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. रेणू शर्मावर झालेल्या आरोपांची चौकशी पोलिसांनी असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!