---Advertisement---

धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा ; अन्यथा….भाजपचा इशारा

On: January 13, 2021 11:47 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक पवित्रा घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप रेणू शर्मा या महिलेनं केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित महिलेने याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली असून, आता या प्रकरणावरून  भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे  यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राच्या माध्यमातून केली.

मुंडे यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल. असा इशारा भाजपने दिला आहे. मुंडे यांनी दोन पत्नी असल्याची कबुली दिली असून, हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत. सामाजिक न्याय खात्याची महत्वाची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने बेजबाबदार व्यक्तीकडे दिली आहे. त्याचा समाजावर विपरित परिणाम होणार. असे भाजपाच्या महिला अध्यक्षा उमा खापरे यांनी सांगितले आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही मुंडेवर निशाणा साधला. ‘3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीमंडळातून बाहेर राहावे. या घटनेने महाराष्ट्राच्या अस्मितेला, संस्कृतीला धक्का पोहचला असून जोपर्यंत आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत मुंडे यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही’ अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे.

 

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपली बाजु मांडत म्हटले आहे की,’माझ्यावर होणारे आरोप पुर्णपणे खोटे असून मला बदनामी, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे मुंडे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!