---Advertisement---

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे – निलेश राणे

On: January 14, 2021 3:05 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांनतर राज्यातील राजकारण तापले आहे.  मुंडेंवरील आरोपामुळे राष्ट्रवादी कोंडीत सापडली असून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. आता भाजप खासदार निलेश राणे यांनी यात उडी घेतली असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

निलेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट करत आपली भूमिका मांडली. कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे आणि दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगा नुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे.


दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की राजकीय आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशावेळी कोणी काही आरोप करत असेल तर त्याची आधी चौकशी होणे आवश्यक आहे. सत्यता न पडताळता निष्कर्षावर येणे योग्य नाही, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!