---Advertisement---

…नाहीतर भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होऊल

On: January 28, 2021 3:41 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादाविषयी बोलत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचाच भाग आहे असे वक्तव्य केले होते. दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सावदीच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. तर काँग्रेसनं तीव्र प्रतिक्रिया दिली असून थेट भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे.  ‘मुंबईकडे वाईट नजरेनं पाहिल्यास भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होऊन जाईल,’ असा इशारा काँग्रेसनं दिला आहे.

 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारच्या भूमिकांचे दाखले देत भाजपवर आसूड ओढला आहे. ‘सावदी यांच्या या मागणीतून मोदी सरकारचा कुटिल डाव दिसून येतो. मुंबईला व महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा भाजपचा अंतस्थ हेतू राहिला आहे. गेल्या सहा वर्षांत मुंबईची, महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची ज्या पद्धतीनं बदनामी केली गेली ते सर्वांच्या समोर आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र व इतर उद्योग गुजरातला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला.

 

मात्र, फडणवीस सरकार गप्प बसून होतं. त्यांच्या या भूमिकेमुळं भाजपचं कारस्थान उघडं पडलं आहे. मुंबईला केंद्रशासित करावं हाच यामागचा हेतू होता. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येऊन बॉलिवूड दुसरीकडं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. सीबीआय, ईडी आणि एनसीबी मागे लावून उद्योगांना नामोहरम केलं जातं. बॉलिवूड कलाकारांना त्रस्त केलं जातं हा याच डावाचा भाग आहे,’ असा आरोप सावंत यांनी केला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!