---Advertisement---

फडणवीसांसोबत भांडण असले तरी पण मी भाजपसोबतच राहणार- महादेव जानकर

On: December 9, 2020 2:38 PM
Follow Us:
---Advertisement---

बारामती : राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. रासप हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. तरीही महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.

 

माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

भाजपावर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार आहे, असे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं असे सांगत माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे भांडण सुरु आहे. पण, त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे महादेव जानकर म्हणाले.

 

याचबरोबर, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. याशिवाय, माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात महादेव जानकर यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला लगावला.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!