---Advertisement---

बिहार व अन्य राज्यातील निवडणुकीतील यशाबद्दल अक्कलकोट भाजपतर्फे जल्लोष

Follow Us:
---Advertisement---

 

 

अक्कलकोट, दि.११ : नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणूक व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश,गुजरात, कर्नाटक या राज्याच्या पोटनिवडणूकीमध्ये भाजपाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल अक्कलकोट शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
हा कौल जनतेने विकासाला दिलेला आहे, जातीवादी शक्तीला जनतेने अजिबात थारा दिलेला नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे, या विश्वासाला ते पात्र आहेत म्हणूनच जनतेनी पुन्हा एकदा या राज्यांमध्ये एनडीएला अर्थात भाजपाला कौल दिलेला आहे,याबद्दल तेथील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे याबाबतीत बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हटले आहे. भाजपवर लोकांचा विश्वास आहे. हा पक्षच देशाला दिशा देऊ शकतो, असे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड यांनी सांगितले तर पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंतचे जे काम केलेले आहे त्या कामाला बळ देण्यासाठी
हा निकाल कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे.हा निकाल काम करण्यासाठी ऊर्जा देईल, असे शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी सांगितले.यावेळी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, प्रभाकर मजगे, शिवशरण वाले, सिध्दाराम मठपती, बसवंत कलशेट्टी, दयानंद बिडवे, अंबण्णा चौगुले, स्वामीनाथ परशेट्टी, दिपक जरीपटके, रमेश कापसे, विनोद मोरे, सुनिल गवंडी, सचिन पवार, कांतू धनशेट्टी, बबलू कामनुरकर, स्वामीनाथ घोडके, सोन्याबापू शिंदे, शिवशंकर स्वामी, संकेत कुलकर्णी, राहूल वाडे, लखन झंपले,सागर डिग्गे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!