ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात 12-13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन

पुणे – राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरण्यात येणार आहेत.

राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम झाला होता. परंतु सध्या उद्योग-व्यवसाय पूर्ववत सुरु होत आहेत. अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने www.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!