---Advertisement---

भागवताचार्य वा.ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन

Follow Us:
---Advertisement---

 

पंढरपूर, दि.२८ : ज्येष्ठ हिंदुत्ववादी विचारवंत आणि प्रसिद्ध भागवताचार्य वा.ना उत्पात यांचे आज कोरोनामुळे निधन झाले.

ते 80 वर्षांचे होते. पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.उत्पात यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यानंतर 13 सप्टेंबर रोजी त्यांना पुण्याला हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला. वा.
ना उत्पात यांचा पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता. स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. महाराष्ट्रात प्रसिद्ध वक्ते म्हणूनही त्यांचा परिचय आहे. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.ते पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य होते.
त्यांची अनेक विषयावरची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!