---Advertisement---

भाजपनेच कंगनाला महाराष्ट्राची बदनामी करण्याची सुपारी दिली ; कॉंग्रेस नेत्याचा घणाघात

On: January 4, 2021 6:33 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई – राज्यातील आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील टीकाटिप्पणी गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. या राजकीय जुगलबंदीत मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी देखील सहभाग घेताना दिसत आहे. खासकरून अभिनेत्री कंगना रनौत सतत महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल करताना दिसते. आता अभिनेत्री कंगनाला काँग्रेसकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

 

कंगनाने ट्विटच्या माध्यमातून केलेल्या पोस्ट या भाजपला खूश करण्यासाठीच होत्या. असा कबुलीजबाब तिने दिला आहे. ‘’सच में भाजपा को खुश करके’’ असे शब्द वापरणाऱ्या कंगनाला भाजपनेच महाराष्ट्राची बदनामी करण्याची सुपारी दिली होती, अशी घणाघाती टीका काँग्रेसनेते सचिन सावंत यांनी केली.

 

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत म्हणाले की, कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली. मुंबई पोलिसांना माफिया म्हटले. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत अस ती म्हणाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा तिने एकेरी उल्लेख करून अपमान केला. या व्यतिरिक्त अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने घेतलेली भूमिका आणि बॉलिवूडमधील ड्रग्स माफियांबद्दल आपल्याकडे खूप माहिती असल्याचा तिने आणलेला आव भाजपच्या इशा-यावरच केले होतो.

 

दरम्यान कंगनाने अद्याप एनसीबीला कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु जनतेच्या पैशातून भाजपने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी तर कंगनाला झाशीची राणी म्हटले यावरून तिला भाजपचे राजकीय संरक्षण प्राप्त होते, हे स्पष्ट होत असल्याचे सावंत यांनी म्हटले.

 

कंगनाच्या वक्तव्यातून महाराष्ट्रातील १३ कोटी जतनेचा अपमान होत आहे. मात्र यातून भाजपचे नेते खुश होत आहेत. भाजप म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय परंपरेला लागलेला कलंक असल्याची टीका यावेळी सावंत यांनी भाजपवर केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!