---Advertisement---

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण

On: November 19, 2020 6:57 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव उचांकी असताना एकनाथाराव खडसे सामूहिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेपासून ते प्रवेश आणि नंतर काही दिवस सततच्या संपर्क भेटींमुळे ते विविध ठिकाणी फिरले आणि अनेक लोकांच्या संपर्कात आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यापासून ते घरातच थांबलेले होते.

२ दिवसांपासून त्यांना त्रास जाणवायला लागल्यापासून त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली आणि ती पॉजिटीव्ह आल्याचे आज सांगण्यात आले आता पुढच्या काळात डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांचे फिरणे आणि लोकांना भेटणे सुरु होऊ शकेल असे त्यांच्या निकट्वर्तिय्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!