---Advertisement---

मोहोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीची संख्या 11 वर

On: January 4, 2021 4:36 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापुर – मोहोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात आली आहे. त्यात शिरापूर, पिर टाकळी,जामगाव, वाघोली, वडवळ या गावांचा समावेश आहे. याआधी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतीची संख्या एकूण 11 वर गेली आहे.

मोहोळ तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये नरखेड मंडळातील भैरववाडी व मनगोळी या दोन गावांची मिळून असलेल्या गटग्रामपंचायतीचा समावेश आहे. या दोन्ही गावांची मिळून एकूण मतदार संख्या 713 आहे. ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या सात आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भैरववाडी गावामधून पाच तर मनगोळी गावामधून सहा असे एकूण 11 अर्ज दाखल झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!