---Advertisement---

राज्यात नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि.२६: राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नविन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. काल दिवसभभरात १९ हजार ५९२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून १७ हजार ७९४ नविन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९ लाख ९२ हजार ८०६ वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.३३ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ७२ हजार ७७५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे
यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!