ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लसीबाबतची मुंबईकरांची प्रतिक्षा संपली ; ‘कोविशिल्ड’ लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल

मुंबई : केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरमच्या दोन कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरला परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटमधील लसीकरणासाठी लसीचे डोस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

आज पहाटे 5.30 वाजता मुंबईत या लसीचा पहिला साठा पोहचला असून लसीबाबतची मुंबईकरांची प्रतिक्षा आता संपली आहे. महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. मुंबईत कांजूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवली जाणार होती, मात्र या स्टोरेजचे काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा परेलमधील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात ठेवला जाणार असल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे 16 जानेवारीला लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभावेळी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!