---Advertisement---

विकासाच्या मुद्द्यावर अक्कलकोट तालुक्यात ‘या’ गावात पहिल्यांदाच होणार बिनविरोध निवडणूक

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील गावकर्‍यांनी सामुहिक निर्णय घेत गाव बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला आहे.यासंदर्भातील बैठक पार पडली.त्यानंतर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून गावपातळीवरील कार्यकर्त्यांचे बैठकीचे सत्र सुरू होते.यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला गावातील सर्व समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रत्येक समाजातील उमेदवाराला
न्याय देण्यात आल्याने गावकर्‍यांनी पंचांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. यंदा पहिल्यांदाच हंजगी गाव बिनविरोध होत असल्याने गावकर्‍यामध्ये एकीचे बळ निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.ग्रामपंचायत निवडणूकीचा निर्णय बिनविरोध झाल्याने सर्व गावकर्‍यांनी गळा भेट घेऊन व हस्तांदोलन करीत आनंद व्यक्त करताना दिसत होते.तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावाला पंधरा लाख रुपये विकास निधी मिळत असल्याने गाव बिनविरोध काढण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.आज पर्यंत गावपातळीवरील प्रत्येक ग्रामपंचायत निवडणूक या अतिशय चुरशीने होत होत्या.यामुळे गावात वादविवाद, संघर्ष उफाळून येताना दिसून येत होते.अनेक तरुणांनी शिक्षण, काम धंदा सोडून महिनाभर निवडणुकीतच गुंतले जायचे. आता ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय झाल्याने गावातील तरुणा पासून ते वयोवृद्धा मध्ये उत्साहा संचारला आहे.गाव बिनविरोध काढण्यासाठी गावातील प्रतिष्ठीत अकरा लोकांची कमिटी नियुक्त करण्यात आली होती.या कमिटीतील अकरा लोकांचा निर्णय अंतिम मानत कमिटीने निवडलेल्या नऊ उमेदवारांना संपूर्ण गावकर्‍यांची सहमती मिळाल्याने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गाव बिनविरोध काढण्यात सरपंच
उमेश पाटील,माजी सरपंच शिवयोगी बाणेगाव,तंटामुक्त अध्यक्ष बसवराज पाटील,अंबण्णा कोळी, महिबूब हुपळे,गुरुबसप्पा हचडे,प्रकाश कुंभार, शिवप्पा कोळी,संतोष म्हमाणे, परमेश्वर कुंभार,जहांगीर नदाफ, सोमनाथ कुंभार,प्रभानंद ख्यादे व गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!