---Advertisement---

स्वामी समर्थांच्या कृपेने उमेदवारीची संधी लाभली – संग्रामसिंह देशमुख यांचे मनोगत

On: November 18, 2020 6:49 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) :-  पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त असून स्वामी कृपेनेच पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारीची संधी लाभली असल्याचे मनोगत व्यक्त केले. पुणे विभाग पदवीधर मतदार संघावर भारतीय जनता पार्टी कडून अधिकृत उमेदवारीचे तिकीट मिळाल्यानंतर ते स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता येथे आले होते.

श्रीकांत देशमुख यांचा यथोचित सत्कार

याप्रसंगी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी संग्रामसिंह देशमुख, माजी मंत्री सुभाष बापू देशमुख, शिक्षक संघाचे उमेदवार जितेंद्र पवार सर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.

यांची होती उपस्थिती

यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीसह भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, धनंजय गडदे, बालाजी पाटील, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव भारतीय जनता पार्टीचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!