हन्नुर,दि.८ : हन्नूर येथील वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा वहिवाट रस्त्याचा प्रश्न निकाली लागला असून हा शेतकर्यांच्या पूर्व संमतीने निर्णय झाला आहे.हन्नुरचे ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीने हा निर्णय झाला आहे. हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित होता.यातून दीडशे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावे लागत होते. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.त्याचबरोबर या रस्त्याची स्थळ पाहणी करण्यासाठी अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड यांनी या सर्व शेतकऱ्याचे अभिनंदन केले आहे. आणि या सर्व शेतकऱ्यांनी आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या संमतीचा आदर्श घ्यावा,असा सल्ला तहसीलदार अंजली मरोड यांनी दिला आहे.मल्लिनाथ बसपा हेगडे , शिवा धानाप्पा हेगडे, गुरूलिंगप्पा धानाप्पा हेगडे , शिवाप्पा सिद्राम भरमशेट्टी यांच्यातल्या संघर्षामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जाण्याची वेळ आली होती. तरीही या सर्वांनी सहमतीने या रस्ता वहिवाट यासाठी दिली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. यावेळी हन्नूरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी, सिद्राम पुजारी, शरणाप्पा हेगडे, मल्लिनाथ हेगडे, शिवप्पा भरमशेट्टी, कल्लाप्पा बकरे आदी उपस्थित होते. यावेळी तलाठी दत्तात्रय पांढरे, मंडलाधिकारी कोळी, कोतवाल रेवणसिद्ध सुतार,श्रीशैल बाळशंकर, राहुल साठे, नारायण इरवाडकर , जनार्दन राजगुरू, अनिल तळवार , दिंगबर साठे आदी शेतकरी उपस्थित होते.