जळगाव : वृत्तसंस्था
तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये येत असल्याने सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे. पंतप्रधान मोदी या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने मोदींकडून जळगाव जिल्ह्यासाठी काही नवीन घोषणा केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचे वाटप करणार आहेत. वर्षाला एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या लखपती दीदींशीही त्यांनी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले की, महिलांनी ऐवढ्या मोठ्या प्रमाणात देशाच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्याचीही वेळ पहिल्यांदा आहे. देशातील 3 कोटी महिलांना लखपती बनविण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना लखपती बनवणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांना संधी दिली तर त्या विश्व बदलू शकतात. महिला अर्थव्यवस्थेचा मुख्य धारेत आल्या तरच विकास होऊ शकतो. देशाचा कारभार 2029 पासून महिलांकडे देणार आहेत. महारार्ष्टातील 75 लाख परिवार हे बचत गटापासून जोडले आहे. 2 कोटी जनतेला बचत गटाशी जोडण्याचा मानस त्यांनी बाेलून दाखवला. तर मोदींच्या नेतृत्वात महिलांचा विकास सुरू आहे, असे म्हणत भारताला विकसित भारत करायचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेमुळे महिला आनंदी झाल्या आहेत. जळगाव ही सोन्याची भूमी असून माझ्या बहिणी सोन्यापेक्षा सरस आहे. आमच्या सरकारकडून महिलांना 3 सिलिंडर मोफत देण्यात येत आहे. मोदींच्या काळात 10 कोटी महिला स्वावलंबी झाल्या आहेत.