---Advertisement---

जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करा : डॉ.यजुर्वेदी,अक्कलकोट लायन्स क्लबचा पद्ग्रहण सोहळा थाटात

Follow Us:
---Advertisement---

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.३ : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर वेळेचे नियोजन करा आणि कुठलीही गोष्ट करण्याआधी त्याचे नियोजन खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन लायन्सचे माजी प्रांतपाल डॉ.व्यंकटेश यजुर्वेदी यांनी केले.

 


रविवारी, अक्कलकोट येथे लायन्स
क्लब ऑफ अक्कलकोटच्या २०२१ –
२२ या वर्षीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा
पद्ग्रहण सोहळा थाटात पार पडला.
त्यावेळी ते बोलत होते. माणसाने नेहमी सकारात्मक विचार करावेत, त्यातून कामाला गती मिळते आणि विचाराबरोबर उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करावे, त्याचे महत्व जीवनात खूप मोठे आहे,असे डॉ.यजुर्वेदी म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वजवंदन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटच्या २०२१ – २२ या वर्षीच्या नूतन अध्यक्षपदी शिरीष पंडित यांची तर सचिवपदी विठ्ठल तेली यांची निवड करून यात प्रथम उपाध्यक्ष म्हणून मल्लिकार्जून मसुती,द्वितीय उपाध्यक्ष सिद्धय्या मठ,तृतीय उपाध्यक्ष शिवानंद नंदर्गी, सहसचिव चेतन जाधव, खजिनदार प्रकाश उन्नद, कमल अळळोळी, प्रकाश
पाटील, राजेंद्र हत्ते,शिवपुत्र हळगोदे, शदिद वळसंगकर, मल्लिनाथ साखरे, शिवशरण खुबा, बाबासाहेब निंबाळकर, सुधीर माळशेट्टी यांचा शपथविधी पार पडला.

कोविड -१९ च्या सर्व नियमांचे पालन करून या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल सार्थक,हन्नूर रोड अक्कलकोट येथे पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रथम उपप्रांतपाल राजशेखर कापसे यांच्यासह झोनचे चेअरमन महेश नळे यांच्यासह एम.के.पाटील, डॉ.अभिजित जोशी, नानासाहेब कोतली, गंगाप्रसाद बंडेवार, दत्ता जाधव,मानिकचंद गोयल,डॉ.अरुण परिचारक, काशिनाथ गोळळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सूत्रसंचालन बाबासाहेब निंबाळकर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!