---Advertisement---

पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती उद्योगपती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्या अश्‍लील चित्रफीती बनवून त्या वेबसाईट आणि अँपच्या माध्यमातून प्रसारीत केल्याच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अटक केली होती. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.

राज कुंद्राला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने राज कुंद्रा याला पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.

राज कुंद्रा यांच्यावतीने जेष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्यातील बरीचशी कलमं जामीन मिळण्यासारखी आहेत, त्यामुळे कुंद्रा यांना कोठडी देऊ नये असा कुंद्रा यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. या गुन्ह्यात बरचसे परदेशी व्यवहार असल्याने याच्या तपासासाठी कोठडीची गरज आहे. कुंद्रा यांच्या पोलीस कोठडीशिवाय आमचा तपास पूर्ण होणार नाही असं मुंबई पोलिसांच्यावतीने कोर्टात सांगण्यात आलं.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!