मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ड्रग्स इंस्पेक्टर (औषध निरीक्षक) पदांसाठी १०९ भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक उमेदवार MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून (mpsc.gov.in) अर्ज करू शकतात.
पात्रता व वयोमर्यादा
- फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्समध्ये पदवी अथवा
- क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली वैद्यकीय पदवी आवश्यक आहे.
- वयोमर्यादा आयोगाने अद्याप जाहीर केलेली नाही.
पगार व फायदे
- मासिक पगार ₹४१,८०० ते ₹१,३२,३०० पर्यंत
- महाराष्ट्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते उपलब्ध
निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा
- गुणांच्या आधारे निवड
- कागदपत्र पडताळणी
अर्ज शुल्क
- सामान्य वर्ग: ₹३९४
- राखीव, अनाथ, महिला: ₹२९४
अर्ज कसा करावा?
- अधिकृत संकेतस्थळ mpsc.gov.in ला भेट द्या
- ‘ऑनलाइन अर्ज’ विभागात जाऊन अर्ज भरा
- कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा
- भविष्यासाठी अर्जाचा प्रिंटआउट घेणे आवश्यक
ही संधी फार्मसी क्षेत्रातील इच्छुकांना सरकारी नोकरीसाठी महत्त्वाची आहे. अर्जाची अंतिम तारीख आणि अधिक माहिती MPSC च्या संकेतस्थळावर तपासा.