---Advertisement---

अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी परीक्षा न्ययालयाकडून रद्द

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी संदर्भात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अकरावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका बसला आहे. कोरोनामुळे राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अंतर्गत गुणांवर आधारित मूल्यांकन करून निकाल लावण्यात आला होता. त्यामुळे ११ वी प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य करण्यात आली होती.

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी प्रस्तावित सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. अकरावी सीईटी न घेता इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

राज्य सरकारने निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली होती, त्यानंतर कोर्टाने आज अंतिम निर्णय दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!