---Advertisement---

रासपच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बंडगर यांचा सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सुनिल बंडगर यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व गटनेते आण्णाराव बाराचारी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत सत्कार केला. यावेळी अमोल कारंडे, रायप्पा पुजारी, भुताळसिध्द इमडे, गणपती कांदे, शिवा जमगे, धोंडिबा कुंभार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना बंडगर म्हणाले की,  पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी माझ्यावर जे विश्वास ठेवून  पद दिले आहे,  त्या संधीचे सोने करेन आणि आगामी होणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद आदी निवडणूकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार कसे जास्त निवडून येतील. यावर जोर लावला जाईल, असे सांगितले.

शेवटी जिल्हा परिषद अध्यक्ष व गटनेते यांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले आणि फक्त आपले सहकार्य यापुढे असेच राहू दे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!