ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निधी वाटप करताना कोणताही भेद बाळगला नाही : आमदार विजयकुमार देशमुख ; शिरवळ येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

अक्कलकोट ,दि १४: अक्कलकोट तालुक्यासह वागदरी जिल्हा परिषद गटासाठी निधी देत असताना कोणताही भेद न बाळगता भरगोस निधी दिला आहे. तालुक्यासाठी निधी कधीही कमी पडू दिलो नाही. मूलभूत सुविधा कसे पूर्ण करता येईल, याकडे सतत प्रयत्न केले, असे प्रतिपादन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.

शिरवळ (ता .अक्कलकोट )येथे जि.प सेस फंड ,१५ वा वित्त आयोग जि.प स्तर डीपीडिसी मुख्यमंत्री पेयजल योजना दलितवस्ती सुधार योजना अंतर्गत ३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व भूमिपूजन व कृतज्ञता समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.

विजयकुमार देशमुख हे पालकमंत्री असताना मंत्रीपदाच्या कार्यकाळात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भरघोस निधी दिल्याबद्दल कृतज्ञता
सोहळा समारंभ शिरवळ ग्रामपंचायतसमोर आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सरपंच बसवराज तानवडे हे होते.

प्रारंभी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. व्यासपीठावर जि.प सदस्य आनंद तानावडे,कृषी सभापती अनिल मोटे सभापती, डॉ.रामलिंग तानवडे, दत्तात्रय तानवडे ,बसलिंगप्पा खेडगी, उत्तम गायकवाड,प्रशांत तानवडे, प्रसन्न तानवडे, मल्लिनाथ स्वामी, राजशेखर मसुती,शिवशिद्ध बुळा, गुंडप्पा पोमाजी, राजकुमार हंचाटे, विजयकुमार ढोपरे,तुकाराम बिराजदार ,श्रीशैल ठोंबरे, मोहम्मद मुल्ला,प्रदीप जगताप आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सोलापूर स्मार्ट सिटी,फ्लाय ओव्हर आदी मोठी कामे केली.अक्कलकोट तालुक्यासाठी जलयुक्त शिवार, नाला सरळीकरण व मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे मोठे काम आम्ही केले. जि प सदस्य आनंद तानवडे यांच्या माध्यमातून वागदरी भागाचा निश्चितच कायापालट झालेला आहे.

यावेळी बोलताना आनंद तानवडे म्हणाले की,आजवरच्या इतिहासात वागदरी गटासाठी जे निधी मी आणले आहे त्यात सिंहाचा वाटा विजयकुमार देशमुख यांचा आहे.जनतेचे प्रेम व आशीर्वादामुळे ही कामे करणे शक्य झाले.

यावेळी अप्‍पाशा देवकर, विलास गायकवाड, अनिता आरेकर,किरण कवडे, सुमित्रा चानकोटे, महादेव पालापुरे, सत्यभामा कोरे, सोनाबाई मनगुळे, दयानंद वरनाळे, निलाबाई कुंभार, केराबाई चौगुले, ग्रामविकास अधिकारी एम. बी. दुधनी,
सुरज सोनके, वसंत माने पाटील,शंकर जोगदनकर, दिपक तानवडे, श्रीकांत भैरामडगी, शंकर घोदे, सतीश कणमुसे, माणीक धायगुडे, बाबासाहेब भोसले, राम मातोळे,अशोक बंदिछोडे,सोनु गायकवाड, विठ्ठल कत्ते, शरणू जिरगे,मकबूल मुजावर, प्रकाश पोमाजी,आसिफ शेख,अंबादास डांगे, मशाक मुल्ला, शौकत पठाण, प्रदिप सलबत्ते, गेद्दप्पा व्हसुरे, जाफर जमादार, बसू बनसोडे, राजु मुलगे यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मल्लिनाथ स्वामी,प्रसन्न तानवडे यांचेही मनोगते झाली. प्रस्तावना ऍड.अमितकुमार कोथमिरे तर सूत्रसंचालन बळवंत जोशी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!