आयुक्त पी. शिवशंकर आणि नगरअभियंता संदीप कारंजेसह अधिकाऱ्यांची फौज पोहचल हद्दवाढ भागात,”या” दोन नेत्यांनी दाखवून दिली कामातली बनवाबनवी
सोलापूर – सभागृह नेता शिवानंद पाटील यांच्या आग्रहाखातर अमृत योजनेतून सुरु असलेल्या ड्रेनेज कामातील दिरंगाई प्रत्यक्ष पाहण्यासाठी आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, नगरअभियंता संदीप कारंजे यांच्यासह अधिकाऱ्यांची फौज आणि मक्तेदारांची टीम आज प्रभाग १८ मध्ये पोहचली. प्रॉपर्टी जोड चेंबरची कामे रखडलेली असल्याने रस्त्यांची झालेली दूरावस्था या टीमने प्रत्यक्ष पाहिली. याच दरम्यान शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर तिथे पोहचले. विनायक नगर, सिध्दरामेश्वर नगर भागात १५ दिवसांपूर्वी ड्रेनेजसाठी खोदलेले खड्डे अद्याप बुजविले नसल्याचे सांगितले. त्याच बरोबर निलम नगर परिसरात ड्रेनेज लाईन टाकून वर्ष उलटले तरी रस्ता लेवल करण्यात आला नाही, प्रॉपर्टी जोड चेंबरचे काम पूर्ण नाही. त्यामुळे लोकांना सर्कस करत ये-जा करावे लागते ही बाब निदर्शनास आणून देते निलम नगर शरण मठाचा मुख्य रस्ता प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली. येताना नगरोत्थान मधून बनलेल्या मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजची झाकणे बसविण्यासाठी महिनाभर लागत असल्याने आकाशवाणी केंद्राजवळील जे. जे. गड्डम टेक्सटाईल्स समोर वाहतुकीला होत असलेला अडथळा दाखवला. आयुक्तांनी ड्रेनेज विभागाचे संजय धनशेट्टी, भालेराव, बक्षी व MJP चे माशाळे आदींना जाब विचारत तत्काळ काम मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर थोबडे चौकात वळण्यासाठी रस्ता दुभाजक तोडण्याची आवश्यकता गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी निदर्शनास आणून दिली. ट्रॉफिक अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत हा विषय घेऊन हा अडथळा दूर करु असा शब्द आयुक्त पी. शिवशंकर व नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिला. नगरोत्थान मधील हा मुख्य रस्ता पुढे माळी नगर व बोळकोटे नगर जवळ सुध्दा ड्रेनेज व पाईपलाईनच्या कामासाठी जागोजागी खोदलेला असून नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी नगरअभियंता कारंजे यांना प्रत्यक्ष नेऊन हे खड्डे दाखवले. या रस्त्याची व्यवस्थित दुरुस्ती करुन देण्यात यावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.