ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील शाळा सुरू ठेवण्यावरून सरकारमध्ये मतभेद? शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवणार

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.n मात्र, राज्यातील शाळा सुरू ठेवण्यावरून राज्य सरकारमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. कारण,  ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे अनेक मंत्र्यांचे मत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी भूमिका तशी भूमिका देखील मांडली आहे. मात्र, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या मुद्यावरुन मंत्रीमंडळात दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसत आहे.

शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर अधिकार द्यावा, असे विभागीय आयुक्तांनी सुचवले होते. ग्रामीण भागात जिथे कोरोनचा प्रादुर्भाव नाही, तिथे शाळा सुरू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यावर शालेय शिक्षण विभाग लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहवाल पाठवणार आहे.  त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी बारावी सोडून सरसकट शाळा १५ फेब्रुवारी पर्यत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

मात्र, आता कुठे दोन वर्षानंतर शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत शैक्षणिक वातावरण निर्मिती होत होती. त्यात सरसकट शाळा बंद करणे हा निर्णय योग्य नसून अशैक्षणिक असल्याचं शिक्षण तज्ज्ञचा म्हणणं आहे. त्यामुळे राज्यात पूर्ण शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेक ठिकाणी विरोध केला जात आहे. त्यामुळे राज्यात शाळा बंद करण्याचा निर्णय हा घाईगडबडीत घेतला गेला का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसता सुरवातीला मुंबई, ठाणे मग पुणे त्यानंतर नाशिक, औरंगाबाद असे करत शहरी भागात दहावीवी आणि बारावी सोडून इतर वर्गाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आले. शिवाय, कोरोना स्थिती पाहून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावे, अशा सूचना देत इतर ठिकाणी शाळा बंद होणार नाहीत, असाही निर्णय झाला. मात्र, आठ जानेवारीला शनिवारी रात्री ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या त्यात दहावी बारावीचे वर्ग सोडून इतर राज्यभरातील सर्व शाळा या १५ फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील असा मोठा निर्णय घेण्यात आला. आता यालाच मोठा विरोध राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक व पालकांकडून होतोय

दरम्यान, ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्यता नाही.
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्याला राज्याचे प्राधान्य आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा चालू करण्यावर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे राज्यातील शाळा आणखी १५ ते २० दिवस बंद राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

कोरोना कमी होतोय असे समजू नये 
मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. १४ टक्के कोरोनाबाधित लोक रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना वाढत असला तरी दिलासादायक बाब  म्हणजे राज्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे. जानेवारीत मृत्यू दर ०:३ टक्के असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!