ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अखेर मीराम तारोन भरतात परतला, अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या तरुणाला चीनने दिले अखेर भारताच्या ताब्यात

अरुणाचल प्रदेशा : अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या तरुणाला चीनने अखेर भारताच्या ताब्यात दिले आहे. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, चिनी पीएलएने अरुणाचल प्रदेशातील तरुण मिराम तारोन यांना भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले आहे.

वैद्यकीय तपासणीसह योग्य प्रक्रियांचे पालन केले जात आहे. अरुणाचल प्रदेशातील १९ वर्षीय मीराम तारोन १८ डिसेंबर रोजी अप्पर सियांग जिल्ह्यातील जिदो गावातून बेपत्ता झाला होता. त्यांच्या सुटकेपूर्वी, रिजिजू यांनी बुधवारी ट्विट केले होते की, “पीएलए लवकरच तरुणाच्या सुटकेची तारीख आणि वेळ जाहीर करू शकते. खराब हवामानामुळे त्यांच्या बाजूने विलंब झाला आहे.”

२० जानेवारी रोजी चिनने बेपत्ता तरुण आपल्या भागात अस्ल्याची माहीती दिली होती. त्यानंतर त्याने आपली ओळख पडताळण्यासाठी भारतीय अधिकार्यांकडुन अधिक तपशिल मागितला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!