तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.१८: अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचाली चालू झाल्या आहेत.यंदाचा गळीत हंगाम डिसेंबर दरम्यान सुरू करण्याचे नियोजन आहे. या पध्दतीने कार्यस्थळावर कामकाज पाहायला मिळत आहे. साखर कारखान्याने विविध विभागात त्या पद्धतीने फिल्डिंग लावली आहे.
अनेकांनी स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कायम स्वरूपी बंद पडल्याच्या चर्चा केली होती.परंतु माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून कारखान्याच्या कार्यस्थळावर ठाण मांडून आहेत. साखर कारखान्याच्या केन यार्ड पासून ते क्रेशर मिल, बॉयलर, टरबाईन, ज्यूस, शुगर मील, गोदाम, प्रशासन विभाग या विभागासह संपूर्ण परिसराची स्वच्छतेचे काम प्रगतीपथावर असून यंत्र सामुग्रीच्या दुरूस्ती करिता तंत्रज्ञाना बोलावण्यात आलेले आहे. याबरोबरच त्यांना लागणारे अधिकारी व कर्मचारी हजर होत आहेत.
एक वेळ अशी होती की, ऊसाची अतिरिक्त परिस्थिती पाहता शेतकर्यांना ऊस तोडून बांधावर टाकण्याची वेळ आलेली होती. त्या काळात स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना हा नव्याने सुरू झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पहिल्याच गळीत हंगामात सर्वोच्च गाळप केल्याने त्या काळात केंद्र सरकारने कारखान्याला गौरविले होते.
यंदा मात्र माजी आमदार पाटील यांनी तालुक्यातील २-३ वर्षापासून पर्जन्यमान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना ऊस घालण्या कामी अडचण निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.दरम्यान या निर्णयामुळे काही जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कार्यस्थळाच्या आजूबाजूला असलेले अन्य व्यवसाय देखील सुरू होण्याची लगबग सुरू झाली आहे